Breaking


"शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की..."


सिंधुदुर्ग : आज शिवसेनेचा ५५ वा वर्धानपनदिन आहे. त्या निमित्ताने शिवसेनेकडून राज्यभरात वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे, असाच एक उपक्रम सिंधुदुर्ग मध्येही राबविला जात आहे. या उपक्रमावर भाजप नेते निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे.


देशातील वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरून भाजपला डिवचण्यासाठी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप करण्याचा उपक्रम राबविला मात्र हा पेट्रोल पंप नारायण राणे यांच्या मालकीचा निघाल्याने "शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे" अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी ट्विटर वरून केली आहे.

1 टिप्पणी: