Breakingधक्कादायक : ११ वीच्या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षिका गेली पळूनपानिपत २ जून : सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे अकरावीत शिकणाऱ्या एका मुलाने त्याच्या महिला शिक्षिकेच्या घरी क्लास लावण्यात आले होते, परंतु या क्लास दरम्यानच विद्यार्थी आणि शिक्षिका पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


हरियाणामधील पानिपत येथे १७ वर्षीय मुलगा २९ मे रोजी नेहमीप्रमाणे दुपारी दोन वाजता शिक्षिकाच्या घरी क्लाससाठी गेला होता, मात्र बराच वेळ होऊनही मुलगा घरी न आल्याने महिला शिक्षिकाच्या घरी चौकशी केली असता शिक्षिका घरातून गायब असल्याचे समोर आले, नंतर मुलाच्या वडिलांनी आपला मुलगा गायब असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.


संबंधित महिला शिक्षिका ही घटस्फोटीत असून तिच्या आईकडे राहत होती. अल्पवयीन युवक हा गेल्या दोन वर्षांपासून या शिक्षिकेच्या घरी  शिकवणीसाठी जात होता. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यानं दररोज चार तास क्लास घेतले जात होते.


दरम्यान, पोलिसांनी या महिला शिक्षिकेविरोधात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या संबंधी कोणतीही माहिती मिळालेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा