Breaking


कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा संपन्नकोल्हापूर : आज कोल्हापूर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळ खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्व स्तरांवर प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.


यावेळी कोल्हापूरचे अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना, "मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजे एकटे लढत आहेत. सर्व मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागे एकजूटीने उभे राहून त्यांना बळ दिले पाहिजे," असे आवाहन यावेळी करण्यात आले. 


दरम्यान, या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील उपस्थित राहून मराठा समाजास आपला पाठिंबा दर्शविला. या आंदोलनास महाराष्ट्रातील समन्वयक, शासकीय नियुक्त्या रखडलेले उमेदवार, विद्यार्थी व मराठा समाजासहीत इतर समाजांचे बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा