Breaking

तेंव्हापासून मी सारखा झोपेतून जागा होतो आणि टीव्ही लावून बघतो सरकार आहे का पडलं." - अजित पवारपुणे : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, एक दिवस सर्वजण झोपेत असतील तेव्हा हे सरकार गेलेलं असेल. या अगोदर देखील भाजप नेत्यांकडून वारंवार महाविकास आघाडी सरकार कधीही पडेल असं वक्तव्य केले जात आहे. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


पुण्यात पत्रकारांसोबत अजित पवारांनी संवाद साधला, यावेळी अजित पवार म्हणाले की, जेव्हापासून चंद्रकांत पाटील म्हटले "हे सरकार झोपेत असताना पडेल तेंव्हापासून मी सारखा झोपेतून जागा होतो आणि बघतो सरकार आहे का पडलं. लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव..." तसेच पुढे म्हणाले की, "हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, असेही जोरदार प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.


तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय, अमकंय, तमकंय कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे. असा टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.


दरम्यान, यापूर्वी सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हणाले होते की, सरकार पडेल हे वक्तव्य चंद्रकांत पाटील झोपेत असताना बोलले असतील. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा