Breaking
सोलापूर : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ विद्यार्थी, युवक, महिला आक्रमक; पोलिसांनी घेतले ताब्यात


सोलापूर, दि. २६ : आज शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत संपूर्ण देशभर सिटू, एसएफआय, जनवादी, डिवायएफआय संघटनानी आंदोलनाची हाक दिला आहे.


सोलापूर जिल्ह्यात आज सिटू, एसएफआय, डिवायएफआय, जनवादी महिला संघटना या सर्व संघटनाच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी "शेती वाचवा, लोकशाही वाचवा" घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.


सिटू चे राज्य सरचिटणीस व जिल्हा सचिव कॉ. एम.एच.शेख, जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष नसिमा शेख, शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, लिंगव्वा सोलापुरे, एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, डिवायएफआयचे जिल्हा सचिव अनिल वासम, जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, अशोक बल्ला व पक्षाचे युसूफ शेख (मेजर), व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, मुरलीधर सुंचू, शंकर म्हैत्रे यांच्या नेतृत्वाने आंदोलन करण्यात आले.

यावेळी शामसुंदर आडम, राहुल भैसे, दीपक निकंबे, किशोर मेहता, बाबू कोकणे, नागेश म्हैत्रे, प्रदीप मरेड्डी, शोभा बोगा, राहुल बुगले, मोहन कोक्कुल, श्रीनिवास गड्डम, अंबादास बिंगी, किशोर गुंडला, बालाजी गुंडे, नितीन माकम, शाबूद्दीन शेख, नरेश दुगाणे इ. सह कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, महिला यांना अटक करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा