Breaking


वडवणीत महागाईच्या प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन


कामगारांसाठी वडवणी मध्ये नोंदणी कार्यालय सुरू करण्याची मागणीवडवणी, दि. १७ : गरीब, कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोणताही  रोजगार उपलब्ध नव्हता. त्यातही प्रचंड महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली असल्याचे म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फ सरकारच्या जनताविरोधी धोरणाच्या विरोधात आज देशभर निदर्शने करण्यात आली. यावेळी वडवणी चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई व व याचा सर्वसामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम दिसून येत आहे, केंद्र सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे, अच्छे दिन चे स्वप्न दाखवुन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्तारूढ झाल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेचे पेट्रोल, डिझेलची भाववाढ करून कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलची शंभरी गाठली आहे. या भाववाढीचा सर्व जीवनवाश्यक वस्तुवर परिणाम होऊन त्यांचे भाव गगणाला भिडले आहेत. खाद्यतेलाचे भाव २०० रूपयांच्या घरात जाऊन पोहचले आहेत.

पेट्रोल-डिझेलची भाववाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, जीवनावश्यक वस्त़ुची महागाई मागे घेण्यात यावी, दिल्ली येथे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदयाच्या विरोधात आंदोलन चालू आहे, तरी शेतकरी विरोधी कायदे तात्काळ मागे घ्यावेत तसेच आशा सेविकांना व कोविड कर्मचाऱ्यांना आरोग्य खात्यात कायम नेमणुक देण्यात यावी. तसेच किमान वेतन तात्काळ देण्यात यावे. बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्यालय वडवणी येथे सुरू करावे, आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी कॉ. लहू खारगे, बांधकाम कामगार नेते कॉ. ओम पुरी, कॉ. ज्योतीराम कलेढोण, कॉ. ऋषिकेश कलेढोण, विष्णू सुरवसे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा