Breakingभारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेच्या वतीने कामगार उप आयुक्तांना निवेदनसुरगाणा / दौलत चौधरी : भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेच्या वतीने कामगार उप आयुक्तांना निवेदन देण्यात आले.


सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या लंबीत व गरजू मागण्या अनेक वर्षांपासून पूर्ण होत नसल्याकारणाने सुरक्षा रक्षकावर अन्याय होऊन त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.


सुरक्षा रक्षकांना दरमहा वेतनात ३ ते ४ हजार वेतनवाढ मिळावी, कोव्हीड मुळे मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मंडळाकडून ५ लाख रुपये मिळण्यात यावे, सुरक्षारक्षकांना ड्युटीवर लागणारे पावसाळी रेनकोट हिवाळी सोटर इत्यादी वस्तू देण्यात यावे, नाशिक महानगरपालिका मध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाचे थकित वेतन तातडीने मिळावे या मागण्या करण्यात आल्या 


यावेळी भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेना जिल्हा प्रमुख सचिन राऊत, शरद भोज, राहुल थोरात, सिकंदर शेख, माधव भामरे, नंदकुमार येलमामे, सचिन राजभोज, दीपक शिरसाठ, मोतीराम पागे, गोविंद थोरात, दीपक डुलगज हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा