Breaking



नांदेड : मागण्या मान्य न झाल्यास १७ जून रोजी सरकारच्या विरोधात आंदोलन - SFI



माहूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरसकट परीक्षा शुल्क माफ करून, सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करा या मागणीचे निवेदन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) माहूर समितीने तहसील कार्यालय मार्फत उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिले आले.


तसेच, ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र आहे त्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेश शुल्क फक्त ५० रुपयेच्या तत्वावर प्रवेश द्यावे, या प्रमुख मागण्यांचे हे निवेदन देण्यात आले आहे.


दरम्यान, १७ जून २०२१ रोजी शेतकऱ्यांची मुलं म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आंबेडकर चौकात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


यावेळी SFI नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे, सुरज कांबळे, चंद्रकांत पाटील, अभि खंदारे, तुषार कांबळे, महेश कांबळे, कश्यप कांबळे, स्टॅलिन सिडाम, अजय पाझारे समाधान माजळकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा