Breakingआदिवासी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी सुरज चव्हाण आणि संबंधित महिलेने मागितली माफी


पुणे
: दोन दिवसांपूर्वी टिक टॉक आणि इन्स्टाग्राम स्टार सुरज चव्हाण आणि त्यांच्या टीम कडून एका व्हिडीओ मधून आदिवासी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान विधान केले होते, त्यावेळी आदिवासी समाजाने संताप व्यक्त केल्यानंतर माफी मागण्यात आली.


एका वेब सिरिस मधील ही व्हिडीओ सुरज चव्हाण यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता, या व्हिडीओ मध्ये मनोरंजना दरम्यान आदिवासी समाजाबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आले होते, हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आदिवासी समाज आक्रमक झाला होता आणि कारवाईची मागणी केली होती, या प्रकरणा नंतर सुरज चव्हाण आणि संबंधित महिलेने दोन वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत आदिवासी समाजाची माफी मागितली आहे. तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून डिलिट करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा