Breakingसुरगाणा : पेट्रोल डिझेल व स्वयंपाक गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन


सुरगाणा (दौलत चौधरी) : पेट्रोल डिझेल व स्वयंपाक गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आसावरी पेट्रोल पंप येथे गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले.


केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. पेट्रोलच्या दराने 100 रुपयाचा टप्पा पार केला आहे. डिझेलचे दरही वाढलेले आहे, डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकरी अजून अडचणीत आलेला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही वाढले असून सबसिडी ही मिळत नाही. 

यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी काँग्रेस पक्षाचे सुरगाणा तालुकाध्यक्ष सखाराम भोये, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अ‍ॅड.चेतन बंगाळ, शहराध्यक्ष चंद्रकांत भोये, युवक काँग्रेस शहराध्यक्ष दिनेश म्हसे, भाऊसाहेब चव्हाण, पंकज पवार, रवींद्र गावित, राजेंद्र चौधरी, भूषण भोये हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा