Breaking
सुरगाणा : वट पौर्णिमेच्या निमित्ताने उंबरदे जिल्हा परिषद शाळेत वडाच्या वृक्षाची लागवडउपअभियंता संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षरोपण


सुरगाणा (दौलत चौधरी) : वट पौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पुजा करतात वडाच्या झाडाला आयुर्वेदात खुप मोठे स्थान आहे. त्याचप्रमाणे वडाचे झाड वितरण असल्याने त्यावर पशु पक्षी, घरटे बांधतात, तसेच पक्षाचा उपयोग पशु पक्षाने चारा म्हणून फळाचा उपयोग होतो. वडाची साऊली दाट असल्याने सुखद गारवा मिळतो. हेच महत्त्व ओळखून जिल्हा परिषद शाळा उंबरदे येथिल शाळेतील आवारात सुरगाण्याचे जिल्हा परिषदचे  उपअभियंता संजय राठोड, शाखा अभियंता ऋषिकेश गरूड, याच्या हस्ते वट वृक्षाचे रोपट्याचे लागवड करण्यात आली.


या वृक्ष लागवड कामी सुरगाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमित साबळे, यानी वृक्षाचे रोपे उपलब्ध करून दिली. 


यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज चौधरी, गुलाब चौधरी, माधव चौधरी, भिमराव चौधरी, चंद्रकांत चौधरी, पडित जाधव, जलपरिषद सदस्य हिरामण चौधरी, मुख्याध्यापक मधुकर जोपळे, शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा