Breaking
सुरगाणा : उबरठानचे लसीकरण नियोजन कौतुकास्पद, माजी संरपच सुरेश चौधरी यांंची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटसुरगाणा / दौलत चौधरी : उबरठान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण संदर्भात केलेले नियोजन कौतुकास्पद असून त्याचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे, असे प्रतिपादन उबरठानचे माजी संरपच सुरेश चौधरी यांंनी केले.


चौधरी यानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणाचा आढावा घेत पाहणी केली. तसेच चौधरी यानी स्वतः च लस घेतली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रकाश महाले, महेश गवळी, सिताराम भोये, गुलाब हेडी, झिना गोतुरणे, काळु वाघेरे, नारायण भोये, सचिन गावडे, ललिता पाडवी, गणपत पवार, वैद्यकीय अधिकारी राजेश चौधरी, विजय कुमावत आदिसह कर्मचारी व नागरिक नागरिक उपस्थित होते.चौधरी यानी आरोग्य केंद्रातील लसीकरण प्रकिया समजावून घेत कर्मचा-याची विचार पुस केली. त्यानी केलेल्या आज पयॅत कामाचे भरभरून कौतुकही केले, आपल्या मनातील न्यूनगंड बाजुला ठेवुन सर्वानी लसीकरणात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी संरपच चौधरी यांंनी यावेळी उपस्थितांना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा