Breaking
सुशिलकुमार पावरा यांनी स्थापन केली 'बिरसा फायटर्स' संघटना


रत्नागिरी, दि. १९ : बिरसा फायटर्स या नवीन संघटनेची स्थापना सुशिलकुमार पावरा यांनी केली आहे. दिनांक 17 जून रोजी कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग व मराठवाडा विभागातील एकूण 57 BKD शाखा पदाधिकारांशी चर्चा करण्यासाठी झूम सभा लावण्यात आली होती. सभेत वसंत पावरा, राजेंद्र पाडवी, मनोज पावरा, केशव पवार, रोहित पावरा, मनोज कामडी, अनंता जाधव, दादाजी बागूल, नंदलाल पाडवी, मधूकर पाडवी, सुभाष पावरा, राकेश वळवी, संतोष वळवी, संपत वसावे, विजय सहारे, ज्ञानेश्वर पवार, चिंधू आढळ, सुरज पटले, मनोहर पाडवी, हिरालाल गायकवाड, प्रितेश पावरा, जितेंद्र पावरा, साहेबराव कोकणी , ईश्वर मोरे, साहेबराव पावरा, ज्ञानेश्वर मोरे, नामदेव मोरे, सुशिलकुमार पावरा, महिला प्रतिनिधीसह आदिवासी पदाधिकारी सदस्य बांधव उपस्थित होते.  


सभेत सर्व विभाग, जिल्हा व तालुका मुख्य पदाधिकारी यांनी उपस्थित राहून नवीन संघटना स्थापन करण्यास सहमती दर्शवली व सुशिलकुमार पावरा यांच्या सोबत काम करण्याची इच्छा सांगून दाखवली. सुशिलकुमार पावरा यांच्या  सोबत नवीन संघटनेत काम करू इच्छूणा-या पदाधिकारी यांनी पूर्वीच्या बिरसा क्रांती दल संघटनेच्या पदांचा राजीनामा दिला आहे. म्हणून नवीन  संघटनेचे नाव ठरवण्यासाठी आज दिनांक 18 जून रोजी सभा लावण्यात आली.

बिरसा फायटर्स या संघटनेच्या नावाला सर्वांनी होकार दिला. भगवान बिरसा मुंडा यांचा आदर्श समोर ठेवून सामाजिक कार्य करण्यासाठी "बिरसा फायटर्स" हे आमच्या नवीन संघटनेचे नाव ठेवले आहे. असे संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले आहे. 

बिरसा फायटर्स या संघनेचा थोडक्यात अर्थ 1) बिरसा सैनिक 2) बिरसा योद्धे 3) लढणारे, लढाऊ, आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे आपण सर्व. असे स्फूर्ती देणारे बिरसा फायटर्सचे अर्थ आहेत, असे सुशिलकुमार पावरा यांनी समजावले. 

काही महत्वाचे बदल करण्याच्या सूचना सुशिलकुमार पावरा यांनी दिल्या. आपल्या विभाग, जिल्हा व तालुका शाखा पूर्वीच्या संघटनेचे नाव बदलून बिरसा फायटर्स असे संघटनेचे नाव ठेवण्यात यावे, संघटनेचा लोगो (चिन्ह) बदलण्यात यावा, संघटनेचे लेटरपॅड बदलण्यात यावे, तालुका जिल्हा शाखा कार्यकारणी आहे तीच राहील, पदाधिकारी व सदस्य पूर्वीचेच राहतील.फक्त संघटनेचे नाव बदलेल, संस्थापक सदस्य (फाऊंडर) मेंबर यांच्याबद्धल सभेत चर्चा झाली आहे, दिनांक 20 जून 2021 रोजी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी अधिकृतपणे घोषित करण्यात येईल, काही पदाधिकारी यांचे बदललेली पदे व  जबाबदारी रविवारी घोषीत करण्यात येईल, मध्यप्रदेश व गुजरात राज्याचे फक्त प्रतिनिधी नेमण्यात येतील, बिरसा फायटर्स च्या  तालुका जिल्हा व राज्य शाखा असे एकूण 73 शाखांची घोषणा दिनांक 20 जून 2021 रोजी करण्यात येणार आहे.

नयी सोच, नयी उम्मीद, नया जोश दाखवून आपण सर्वांनी नवीन संघटन स्थापन करण्यास होकार दर्शवला व नव्या संघटनेचे साथीदार झालेत. म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे. उलगुलान जारी है और जारी रहेगा! हे ब्रीदवाक्य आपल्या बिरसा फायटर्स संघटनेचे राहील असे सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा