Breaking
नांदेड विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घ्या, एसएफआय ची मागणी


२१ जून ला आमरण उपोषणाचा इशारा


मुखेड, दि. २० : स्वामी रामनंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या बी.ए, बी. काॅम, बी.एस.सी च्या उन्हाळी २०२१ च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब असंख्ये विद्यार्थ्यांना या ऑनलाईन परीक्षेचा मोठा फटका बसु शकतो. त्यामुळे जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्या विद्यार्थ्यांनची त्या त्या महाविद्यालयात ऑफलाईन  पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी.यासाठी दि १८ जून रोजी एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या वतिने प्राचार्य मार्फत कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले.

व मागण्या मान्य न झाल्यास २१ जून पांसुन महाविद्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला.यावेळी एसएफआय चे विजय लोहबंदे , पवन जगडमवार यांच्या सह असंख्ये विद्यार्थी उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर विद्यापीठ स्तरावरील परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरवण्यात आले. पण या ऑनलाईन परीक्षेचा फटका ग्रामीण भागातील असंख्ये विद्यार्थ्यांना बसणार आहे.म्हणून ऑनलाईन परीक्षा पद्धतीच्या विरोधात दि २१ जून रोजी सकाळी ११ वाजता एसएफआयचे विद्यार्थी नेते पवन जगडमवार हे मुखेड येथील शाहीर आण्णा भाऊ साठे महाविद्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.

विद्यार्थी म्हणतात

ग्रामीण भागातील गोरगरीब अनेक विद्यार्थ्यांन कडे चांगले मोबाईल नाहीत, ग्रामीण भागात इंटरनेट सेवा निट चालत नाही, अनेक वाडी , तांड्यावर आजही नेटवर्क उपलब्ध नाही, अनेक गावात टाॅवरच नाहीत , तर सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत राहत नाही. छोटा ही पाऊस झाला तरी विज पुरवठा खंडीत केला जातो. मुसळधार पाऊस व वादळी वारा सुटल्यावर तर एक एक दिवस विज पुरवठा खंडीत असतो. अशावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यावी. यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.म्हणून ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने परीक्षा घ्यावी. अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा