Breakingटाटा मोटर्सच्या 2 लाख कारची विक्री, 'ही' कार ठरली लोकप्रिय


पुणे : टाटा मोटर्स ही पुण्यातील सर्वात मोठी ट्रक, बसेस आणि कार उत्पादक कंपनी आहे. सर्वात जास्त रोजगार देणाऱ्या या भारतीय कंपनीने परदेशी कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेत अतिशय सेफ आणि किफायतशीर किंंमतीमध्ये आपल्या ग्राहकांना दर्जेदार मोटारी दिल्या आहेत.


टाटा मोटर्सची भारतातील प्रसिद्ध एसयूव्ही Nexon लाँच झाल्यापासूनच चांगली लोकप्रिय ठरत आहे. देशाच्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील ही सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक आहे. कंपनीने निक्सॉनच्या बाबतीत एक मोठा टप्पा ओलांडला असून अलिकडेच निक्सॉनच्या २,००,००० वी युनिट रांजणगाव पुण्यातून रोलआउट केली आहे. म्हणजेच आता कंपनीने २ लाख निक्सॉन रोलआउट करण्याचा टप्पा ओलांडला आहे. 

करोना संकटामुळे निक्सॉनच्या ५० हजार युनिट्सच्या उत्पादनासाठी टाटा मोटर्सला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला. अन्यथा हा टप्पा Nexon ने यापूर्वीच ओलांडला असता.

देशातील प्रमुख कार कंपनी टाटा मोटर्सच्या Tata Nexon या कारचा केवळ कंपनीच्या बेस्ट सेलिंग कार्समध्येच समावेश होतो असं नाही, तर या कारने भारतातील सर्वात सुरक्षित कार असल्याची ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंगही मिळवली आहे. 

सेफ्टीसाठी वर्ष २०१८ मध्ये Global NCAP कडून निक्सॉनला ५-स्टार रेटिंग मिळाली होती. त्यावेळी सेफ्टीसाठी ५-स्टार रेटिंग मिळवणारी ही भारतातील पहिली कार ठरली होती. कंपनीने Nexon ला पहिल्यांदा वर्ष २०१७ मध्ये लाँच केले होते, सध्या Nexon SUV भारतात २० व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या रेंजमध्ये १२ पेट्रोल व्हेरिअंट आणि डिझेलमध्ये ८ व्हेरिअंट ऑटोमॅटिक व मॅन्युअल ट्रान्समिशनच्या पर्यायांसह आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हर्जनमध्ये येते. कारमध्ये पॉवरसाठी १.२ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिलं आहे, हे इंजिन ११८ bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि १७० Nm पीक टॉर्क निर्माण करतं. याची १.५-लीटरची मोटर १०८ bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि २६० Nm पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिनमसोबत ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन स्टँडर्ड म्हणून मिळेल, तर ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा