Breaking
ठाणे : इको सेन्सिटिव्ह झोनला किसान सभेचा विरोध, पेसा व वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी


ठाणे, दि. ४ जूूून : वन विभागाने आयोजित केलेल्या इको सेन्सिटिव्ह झोन बाबतच्या बैठकीमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ४२ गावांमध्ये लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधांना विरोध दर्शवणारे व या संबंधीत गावांमध्ये पेसा कायदा व वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.


यावेळी उप वन संरक्षक हिरे, सहाय्यक उप वन संरक्षक कोळेकर यांना किसान सभेने निवेदन दिले. या बैठकीला अखिल भारतीय किसान सभेच्या कॉ. कविता वरे, दिलीप कराळे उपस्थित होते. 

कविता वरे म्हणाल्या, शासन लोकशाही पद्धतीने निर्णय न घेता हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेऊन सर्वांवर लादत आहे. ज्या वेळेला हा निर्णय घेण्यात आला त्याच्या पोच पावती व ठरावाचे कागदपत्र सर्वाना खुले करण्यात यावे व संघटनेला उपलब्ध करून द्यावेत, स्थानिकांची समिती बनविण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या. 

या बैठकीला मुरबाड तालुक्यातील १५ गावांचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक असताना फक्त ३ गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते ही बाब अधोरेखित करणारी आहे, असेही वरे म्हणाल्या. तसेच सर्व गावांच्या लोकप्रतिनिधिंची येणाऱ्या पुढील प्रत्येक बैठकीमध्ये उपस्थिती असली पाहिजे, अशी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा