Breakingठाणे : दूध उत्पादकांंची होणारी लूट थांबवा, किसान सभेचे तहसीलदारांना निवेदन


मुरबाड (ठाणे) : दूध उत्पादकांंची होणारी लूट थांबवा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसीलदार अमोल कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य समितीच्या आव्हानानुसार ठाणे पालघर जिल्हा कौन्सिल च्या वतीने मुरबाड तहसीलदारांना दूध उत्पादकांच्या रास्त मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दूध उत्पादकांची लूट थांबवा, दूध कंपन्या व संघांचे ऑडिट करा यासह अन्य मागण्यांंचा समावेश आहे.

निवेदन देतेवेळी कॉ. कविता वरे, सिटूचे तालुका सचिव दिलीप कराळज व शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा