Breakingबांधकाम व्यावसायिकांचा जेसीबी खोदलेल्या खड्ड्यात बुडाला


आकुर्डी : आकुर्डीत वादळी पावसामुळे सर्वत्र रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आकुर्डी - पूर्व मोसमी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. मनपाच्या अर्धवट विकास कामामुळे खोदलेल्या रस्त्यावर डांबरीकरण, काँक्रीटीकरण अपूर्ण आहे. चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आकुर्डीत विवेकनगर, भाजी मंडई, मेन रोड येथील कामे वर्ष होऊन सुद्धा पूर्ण होत नाहीत.


आकुर्डी मनपा दवाखान्यासमोर एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्लॉटच्या संरक्षित कुंपणाचे पत्रे सोसाट्याच्या वाऱ्याने उडून गेले, तर फौंडेशनच्या मोठ्या खड्ड्यात प्रचंड पाणी साचून त्यामध्ये जेसीबी मशीन बुडाले. शहरातील पावसाळी स्थितीचा गंभीर विचार करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा