Breaking


घरेलू कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार - काशिनाथ नखाते


आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिन धान्य वितरण करुन  साजरा 


पिंपरी दि. १६ - महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, वर्किंग पीपल चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील गरजू  आणी ज्यांच्या हातचे काम केले आहे कष्टकरी कामगारांना अन्नधान्याचे वितरण करून घरेलू कामगार दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने ,सलीम डांगे महिला विभागाच्या प्रमुख माधुरी जलमुलवार , बेबी मोरे, मंगल इचके ,  छाया गवळी, सीमा सुंदर,  संगीता कारंडे, सीता टकले, शिलाबाई लवटे, सुषमा काळे, आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेने घरेलू कामगारांसाठी  सनद १८९  मंजूर केली असून त्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत घर कामगारांच्या भीषण परिस्थिती कडे केंद्र आणि राज्य शासनाने पाहणे गरजेचे आहे कोरोना कालावधीमध्ये घरेलू कामगारांना काम मिळत नाही हातचे काम गेले, आणि सोसायटी मध्ये जाताना  तपासणी केल्याचे प्रमाणपत्र मागतात, व्हॅक्सिनेशन केलेला आहे का अशा प्रकारची मागणी होत आहे, काळजी घेणे गरजेचे आहे परंतु त्यांचे काम चालले पाहिजे त्यांच्या त्यांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे त्याचबरोबर घरेलू कामगार महामंडळ पुनर्जिवित करण्यासाठी महासंघ नक्कीच शासनाकडे पाठपुरावा करेल  आणि त्यानुसार त्यांच्या हक्काचे लाभ मिळवून देऊ असे मत यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

माधुरी जलमुलवार म्हणाल्या काही महिलांना राज्य शासनाच्या अनुदान मिळाले बाकी काही महिलांना अजूनही मिळाले नाही ते लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे तसेच या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा