Breakingनवीन शैक्षणिक वर्ष 'या' तारखेपासून सुरु होण्याची शक्यता !


मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. याबाबतचे वृत 'सामना' दिले आहे.


बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा जुलैअखेर घेऊन, 15 ऑगस्टपर्यंत निकाल आणि 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. तर बीए , बीकॉम, बीएससी अशा विनाव्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी घ्यावी आणि घेऊ नये, असे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात बारावीचे निकाल हाती आल्यानंतर कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, असेही उदय सामंत यांनी सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा