Breaking


आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार - उज्वला पडलवार


आशा व गटप्रवर्तक यांचा निर्धार !


नांदेड, दि. १७ : मागील 2 दिवसापासून आशा व गट प्रवर्तक यांचा राज्य व्यापी संप सुरू आहे. राज्य शासन सातत्याने मागण्याकडे दुर्लक्षित करत असल्यामुळे जो पर्यंत मागन्या मान्य होत नाहीत तो पर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी सांगितले. 

मागील 2 वर्षापासुन कोरोना चा काळात आशा व गट प्रवर्तक यांनी जिवाची बाजी लाऊन काम केले..आज ही करत आहेत परंतू त्यांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अतिशय तुटपुंज्या मानधनावर त्यांना शासन राबून घेत आहे. त्यामुळे जोपर्यंत किमान वेतन लागू होत नाही. तसेच आशा व प्रवर्तक यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही व कोव्हीड कामाचे प्रती दिन ५०० रुपये या सह अन्य मागन्या मान्य होत नाहीत तो पर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. तसेच संप काळात कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्यांनी आशा व गट प्रवर्तक यांना दबाव आणल्यास योग्य उत्तर दिल्या जाईल, असेही काॅ.पडलवार यांनी स्पष्ट केले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा