Breakingसांगोल्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे कार्य आदर्शवत : दिपाली पांढरे


निरीक्षक दिपाली पांढरे यांनी घेतला पक्षाच्या कार्याचा आढावा  


सांगोला (अतुल फसाले) : सांगोला शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील व महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा जयमला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अभिप्रेत असणारे कार्य सुरू आहे. सांगोला तालुक्यातील महिला आघाडीचे काम आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या निरीक्षक दिपाली पांढरे यांनी काढले.

शनिवार दि 12 रोजी निरीक्षक दिपाली पांढरे यांनी सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी त्या बोलत होत्या, यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमला गायकवाड, पंढरपूर तालुका अध्यक्षा रंजना हजारे, सांगोला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सखुबाई वाघमारे, विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा सुचीता मस्के, शहराध्यक्ष शुभांगी पाटील, मंगल खाडे, जयश्री पाटील, हसीना मुलानी, संगीता वाघमारे, हिरकणी पाटील,  चैत्राली बनकर, चारुशीला साळुंखे, जवळा गावच्या सरपंच सविता बर्वे, अनुराधा गायकवाड, इंदुबाई बागल, वनिता बनसोडे, उषा बनसोडे व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

पुढे बोलताना दिपाली पांढरे यांनी सांगितले की, सांगोला तालुक्यातील पक्षसंघटना नशीबवान आहे ज्यांना दिपकआबा व जयमलाताई या बहीण-भावांचे मार्गदर्शन लाभले आहे. राज्यपातळीवर पक्षाचे कार्य करत असताना या दोन्ही बहीण-भावांचे आपणास नेहमीच मार्गदर्शन लाभते, तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर व उपाध्यक्षा जयमलाताई गायकवाड यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळेच आपण आपल्या पदाला न्याय देऊ शकत असल्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी आगामी काळात खेडोपाडी पोहोचून घरोघरी राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार पोहोचविण्याच्या सूचना केल्या. जयमलाताई गायकवाड यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा विचार गावोगावी रुजवला आहे. हाच विचार वाढविण्याचे कार्य राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी करावे अशा सूचनाही शेवटी निरीक्षक दिपाली पांढरे यांनी दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा