Breaking


आज बिरसा क्रांती दलाच्या 57 शाखा पदाधिकारी यांचा महत्वाचा निर्णय होणार


रत्नागिरी : सामाजिक कामे करताना अडथडा निर्माण करणे, सामाजिक कामात राजकीय हस्तक्षेप होणे, पदावर अपमानजनक वागणूक व सोशल मिडीयावर अगदी खालच्या पातळीवर येऊन माझी वैयक्तीक बदनामी संघटनेतीलच काही पदाधिकारी करत असल्या कारणास्तव सुशिलकुमार पावरा यांनी राज्याध्यक्ष युवा आघाडी बिरसा क्रांती दलचा अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.


पदापेक्षा आपल्याला समाज व सामाजिक कामे महत्वाची असून आपण पदासाठी लाचार होणार नाही,असे राजीनाम्यात म्हटले आहे. दशरथ मडावी संस्थापक अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांच्या पत्रामुळेही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दरम्यान काही 2-3 शाखा पदाधिकारी ट्रायबल फोरम संघटनेत गेले आहेत.

कोकण विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग व मराठवाडा विभागातील बिरसा क्रांती दलाच्या एकूण 57 शाखा पदाधिकारी यांची आज 17 जून रोजी रात्री 8 वाजता झूम सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत 57 बिरसा क्रांती दल शाखा पदाधिकारी संघटनेत राहायचे किंवा नाही हा महत्वाचा निर्णय घेणार आहेत.

सुशिलकुमार पावरा यांच्याकडे नवीन युवा कार्यकर्ते यांचा अधिक कौल असून सुशिलकुमार पावरा जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असे काही तालुका व जिल्हा पदाधिकारी यांनी फोनद्वारे सांगितले आहे. तर काही पदाधिकारी यांनी व्हाट्सएपवर खालीलप्रमाणे मेसेज सोडून विनंती केली आहे.

जय आदिवासी जय बिरसा जय जोहार! सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की, मिटिंगचा विषय जरा गंभीर आहे पण आपणही विषयापेक्षा खंबीर राहून काहीही झाले तरी सुशीलकुमार सरांचा राजीनामा परत घेण्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी सर्वांनी या मिटिंग साठी उपस्थित रहावे, सर्वसामान्य जनतेला सरांसारखे मार्गदर्शन कोणीही करु शकणार नाही जोपर्यंत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सरांची धडपड चालू असते म्हणून आपापल्या मार्गदर्शन करण्यासाठी व युवा वर्गास योग्य दिशा देण्यासाठी सर नेहमी प्रयत्नशील असतात म्हणून आपण सर्वांनी मडावी साहेबांना एक विनंती अर्ज पाठवू व सरांच्या मार्गदर्शनाने आपला समाज अन्याय मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू.

जय आदिवासी जय बिरसा जय जोहार
बिरसा क्रांती दल तालुका टिम. असा संदेश पाठवला आहे. दरम्यान आजच्या सभेत पदाधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेऊन आपण योग्य निर्णय घेणार असल्याचे सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले आहे. आपण कुठल्याही अन्य संघटनेत जाणार नसून वेळ आली तर सर्वांच्या सहमतीने स्वतःचे नवीन संघटन तयार करून नव्याने कामाला सुरवात करणार असल्याचे सूचक इशारा सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे. आपले नवीन संघटन हे भगवान बिरसा मुंडा यांचा आदर्श ठेवून बिरसा मुंडा यांच्या नावानेच असेल, असे पावरा यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सभेत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा