Breaking

दत्तगड येथे दिघी विकास मंच व अविरत श्रमदान संस्थेच्या वतीने वृक्षरोपण


चला झाडे लावूया, पर्यावरणाला साथ देऊया ..!!


दिघी : ५ जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त दिघीची विषेश वास्तू सणारे दत्तगड या गडावर दिघी विकास मंचाच्या सौजन्याने व अविरत श्रमदान संस्थेच्या सहकार्याने वृक्षरोपण करण्यात आले.


तसेच गेली ४ वर्ष अविरतपणे श्रमदान करत झाडांचे सवर्धन, संगोपन करणे अशा निसर्गप्रेमीचा मंचाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सदस्यांनी शपथ घेत पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. झाडे लावू, पाणी वाचवू, नैसर्गिकचे रक्षण करू. पर्यावरणाचा समतोल राखू .., हा संदेश दिला.


यावेळी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हारीभाऊ लबडे , सल्लागार के. के. जगताप, सुनिल काकडे, कॅप्टन अशोकराव काशिद, दत्ता घुले, धनंजय खाडे, अभिमन्यू दोरकर, रमेश विरणक, समाधान माने, प्रशांत कुर्हाडे, अविरत श्रमदान ट्रस्ट अॅड सुनिल कदम, ॲड.जितेंद्र माळी, भुजंग दुधाळे, प्रभाकर नागरगोजे, सीमा शिंदे, संतोष काळे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा