Breakingबिरसा क्रांती दलात आदिवासी संघर्ष समिती ठाणे येणार : सुशिलकुमार पावरा


रत्नागिरी : आदिवासी संघर्ष समिती जिल्हा ठाणे ही संघटना बिरसा क्रांती दलात येणार असल्याची माहिती बिरसा क्रांती दलाचे युवा राज्याध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. यापूर्वी क्रांतीवीर बिरसा मुंडा युवा प्रतिष्ठान बुलढाणा व आदिरावण ग्रूप (संघटना ) बिरसा क्रांती दलात आल्यानंतर आता आदिवासी संघर्ष समिती जिल्हा  ठाणे  बिरसा  क्रांती  दलात शामिल होणारी ही तिसरी संघटना असेल.


आदिवासी संघर्ष समिती ठाणे संस्थापक अध्यक्ष यांच्याशी बातचीत झाली आहे व दशरथ मडावी यांनाही मी याबाबत कल्पना दिली आहे, अशी माहिती  सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.

आपल्या कामाने प्रभावित असून अनेक वाटसपग्रूप आपली कामे रोज बघत असतो. तुमच्या सारखे युवकांसोबत मला काम करायला आवडेल. मला सामाजिक कार्यात युवकांची साथ हवी आहे. तुमचा होकार असेल तर  बिरसा क्रांती दलात आमची संपूर्ण संघटना विलीन करून एकत्र काम करू अशी प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष आदिवासी संघर्ष समिती ठाणे यांनी दिली आहे. त्यामुळे लाकडाऊन संपल्यावर  एक कार्यक्रम घेऊन या संघटना पदाधिकारी यांचे जंगी स्वागत करू, अशी सहमती सुशीलकुमार पावरा व संस्थापक अध्यक्ष आदिवासी संघर्ष समिती जिल्हा ठाणे यांच्यात झाली आहे.  

आदिवासी संघर्ष समिती जिल्हा ठाणे संघटनेचे बिरसा क्रांती दलात सर्व पदाधिकारी यांनी  हार्दिक स्वागत केले आहे. कार्यक्रमात औपचारिक रित्या स्वागत समारंभ होईल. बिरसा क्रांती दल संघटन झपाट्याने  वाढत असल्यामुळे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी सुशीलकुमार पावरा सह युवा आघाडीचे कौतुक केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा