Breaking

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जन्मदिनी सोशल मीडियावर "युपी बेरोजगार दिवस" ट्रेंडमुंबई : आज ५ जून रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म दिवस आहे, त्यांच्या जन्म दिवसाच्या निमित्त सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे याच सोशल मीडियावर "युपी बेरोजगार दिवस" ट्रेंड चालवला जातो आहे.


गेल्या काही वर्षांपासून देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली, सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढत असताना त्यात कोरोनाने महामारीने आणखी बिकट अवस्था झाली आहे. रोजगारासाठी देशभरात सातत्याने आंदोलने केली जात आहे. परंतु युवकांच्या हाती निराशाच मिळत असल्याचे युवकांचे म्हणणं आहे, त्यामुळे आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जन्मदिनी राज्यातील बेरोजगारी या मुद्द्याला घेऊन "#यूपीबेरोजगारदिवस", आणि "#बेरोजगारदिवस_युपीमांगे_UPPRT" हे ट्रेंड चालविले जात आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी देखील "राष्ट्रीय बेरोजगार दिवस" हा ट्रेंड ट्विटरवर चालविण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा