Breaking
वि स खांडेकर प्रशाला छत्रपती शाहू महाराजांची जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरीकोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी ४५० पेक्षा अधिक पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते, या कार्यक्रमास प्रमुख वक्ते राजेश वरक यांनी गुगल मोड वरून शाळेतील सर्व विद्यार्थी व पालकांना छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली व आपल्या आयुष्यात त्यांच्या कार्याचे अनुकरण करून मार्ग अवलंब करावे असे आवाहन केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका नेहा कानलेकर यांनी केले तर आभार शिला कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन नागेश हंकारे यांनी केले, प्रसंगी मधुकर भिउंगडे, विवेक पवार, राजेंद्र कुंभार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा