Breakingआम्हाला डांबरी रस्ता मिळेल काय ? ; बोरघर ग्रामस्थांची विचारणा


बोरघर (दि.२८ ) :
आंबेगाव तालुक्यात बोरघरची काळवाडी कडे जाणारा रस्ता अतिशय वाईट स्थितीत आहे , अनेक वहाने या दलदलीत फसत आहेत , गाडया रस्ता सोडून चिखलातुन दूर घसरुन जात आहेत . शहरी भागात तेल सांडले तर भरुन घेता येईल असे चक्क चक्कीत डांबरी , सिमेंटचे रस्ते आहेत , मग आम्हाला डांबरी रस्ते केव्हा मिळतील , असा सवाल काळवाडी ( बोरघरचे ) ग्रामस्त करत आहेत . 


बोरघर गावची काळवाडी डोंगरावर बसली आहे , बोरघर उंबरवाडी काळवाडी हा रस्ता खूपच खराब आहे . सुकाळवेढे फाटा ते घोडेवाडी , माळवाडी कडे जाणारा कच्चा रस्ता आहे . खडडी पूर्ण उखडल्याने मे महिन्यात रोजगार हामीतुन रस्तावर माती , मुरुंब टाखला गेला , परंतु पावळ्यात हा सर्व रस्ता चिखलमय झाला आहे . अनेक वहाने चिखलात फसुन रस्त्यातुन घसरुन बाजूला जातात , त्यामुळे अपघातही होऊ शकतात . फसलेली वहाने जेसीबी किंवा टॅक्टरने ओढुन काढावी लागतात.आजारी माणसाला पावसाळ्या दवाखान्यात घेऊन जाण्यास खूप मोठी अडचण झाली आहे , शेवटचा पर्याय म्हनुन डोंगर उतरुन पाई प्रवास करणे हा अनेक वर्षापासुनचा त्रास सहन करावा लागत आहे , रेशन , बाजार , खते , बियाणे डोक्यावर घेऊन डोंगर चढत काळवाडी, माळवाडी ला जावे लागते . 


आमचा हा वनवास केव्हा थांबेल व आम्हास डांबरी रस्ता केव्हा मिळेल ? अशी विचारणा कुंडलिक पोटे , नामदेव बांबळे , कुशाबा पोटकुले , बारखु बांबळे यांनी केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा