Breaking


"होय ! मी भक्त आहे ! आणि याचा मला अभिमान आहे" - अमृता फडणवीसमुंबई : देशातील कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात येत असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात लसीकरणाचा वेग वाढला आहे. यावरून अमृता फडणवीस यांनी आपले मत मांडले आहे.


माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी "होय ! मी भक्त आहे ! आणि याचा मला अभिमान आहे !" असे ट्विट करून म्हटले आहे. या ट्विट सोबत त्यांनी लसीकरणाचा आलेख जोडला आहे. त्यात भारत, यूएसए, युके, जर्मनी, फ्रान्स, इटली या देशांत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यामध्ये भारताने लसीकरणामध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. (२८ जूनच्या आकडेवारीनुसार) भारतात सर्वाधिक ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस देण्यात आले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून अमेरिकेने एकूण ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस दिले आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा