Breakingकोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्काळ अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घ्यावे - प्रकाश पवारपुणे, दि. ९ : कोरोना महामारीच्या संकटकाळात दुर्दैवी मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना तत्काळ अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी माागणी शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपण त्यांच्या दुःखाप्रती सर्वच संवेदनशील आहोत. अचानक कुटुंबातील कर्तबगार व्यक्तीच्या जाण्यामुळे त्या कुटुंबावर मोठे संकट आलेले आहे. त्यांना या गंभीर परिस्थितीतून सावरण्यासाठी शासनाने त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सभासदास अनुकंपा तत्त्वावर तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन तसा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा