Breakingमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात तातडीने पुनर्विचार याचिका दाखलमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये नाराजी पसरली होती. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली होती.


मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी राज्यभर दौरा केला होता, त्यावेळी संभाजीराजे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट घेतली होती, त्यानंतर कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी मूक मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी राज्य सरकारकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर राज्य सरकारकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.


खासदार संभाजीराजे यांनी ट्विट केले आहे की, मराठा आरक्षणबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली तसेच या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असेही ट्विट मध्ये म्हटले आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा