Breaking
निवडणूकीचा वाजला बिगूल, दिघीत प्लेक्स वर झळकतेय समस्येचे मूळदिघी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दिघीगाव समाविष्ट होऊन २० वर्षे झाले. तरी दिघीकर अजूनही विकास या शब्दाच्या प्रतिक्षेत आहे. गावखाती कारभार असताना हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. महापालिकेची निवडणूक प्रथम येथे झाली तेव्हा शिवसेनेचे पुर्ण पँनेलने निवडून आले. वाढत्या विस्ताराने राष्ट्रवादी कडे असलेला मतदारांनी २००७ ला सत्ता परिवर्तन केले आणि दोन नगरसेवक या भागातून राष्ट्रवादी चे निवडून आले आणि शिवसेनेचा बालेकिल्ला जो ढासळला तो काय अजूनही सावरलेला नाही. 


२०१२ मध्ये ही राष्ट्रवादी ने इथे आपले वर्चस्व शाबूत ठेवले. पण २०१७ ला मोदी लाटेत भाजपने इथे घवघवीत यश मिळवले. पण दिघीकर अजूनही वाट पहात आहे. त्या समस्या, अडचणी दूर झालेल्या नाहीत. आरक्षणे विकसित नाही, मुलांना खेळायला मैदाने नाही अथवा जेष्ठ नागरिकांना गार्डन तसेच विंरगुळा केंद्र नाही. व्यायामासाठी नागरिकांना दत्तगडावर जाण्यशिवाय पर्याय नाही.


सरकारी दवाखान्यसाठी भोसरी दवाखाना आणि वायसीएम वर अवलंबून रहावे लागते. दिघीचा वाढता विस्तार पहाता २४ बाय ७ पाणी योजना स्वपनवत च आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न 'जैसा थे' आहे. स्थापत्य विभागाचा ठेकेदार अनुकूल धोरण दिघीतील खड्डयांना पोषक वातावरण आहे. नेहमीच येतो पावसाळा खड्डे घेऊनी अशी परिस्थिती आहे. दिघीचे राजकारण पाण्यभोवती फिरते. दिघीकराची ती मुलभूत गरज आहे. या पाणीबाणी मुळे २००२ पासून दिघीकरानी एकदा निवडून दिलेला नगरसेवक परत महापालिकेत पाठवलेला नाही. अशा परिस्थितीत आता २०२२ ची महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे. विद्यमान सदस्यांमध्ये कदाचित एखाद्या पुन्हा संधी दिघीकर देतात का नाही हे पहाणे औत्सुक्याचे राहील. 


मात्र यावेळी राष्ट्रवादी ने जोर लावला असून दिघीकराच्यां भावनेला हात घातला आहे. दिघीच्या समस्येचे मोठमोठाले प्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. भोसरीचे प्रथम आमदार विलास सेठ यांनी वाढवलेली सक्रियता पाहता भाजपला म्हणाव तसे यश मिळणे कठीण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा