Breaking
पंकजा मुंढे शिवसेनेत आल्या तर स्वागत करू : शंभूराजे देसाई


बीड : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात  खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले होते. तर दुसरीकडे, पंकजा मुंडे या शिवसेनेमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच आहे, वरिष्ठ नेते योग्य सन्मान देतील, असं सूचक विधान वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई  यांनी केलं आहे.


गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद देण्यात न आल्यामुळे भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वावर अन्याय झाला, अशा चर्चा रंगली आहे. यावर बोलत असताना शंभुराजे देसाई यांनी पकंजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफरच देऊन टाकली आहे.

'पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि त्या जर शिवसेनेमध्ये आल्या तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचे स्वागत होईल आणि त्यांचा योग्य मानसन्मान हा आमचे नेते करतील, असं शंभुराजे देसाई म्हणाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा