Breaking
ब्रेकिंग : चेंबूर येथे ५ घरांवर भिंत कोसळून ११ जणांचा मृत्युमुंबई : मुंबईत कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे चेंबूर येथे ५ घरांवर भिंत कोसळून त्यात ११ जणांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


वाशीनाका येथील न्यू भारतनगर येथे डोंगराच्या कडेला ही वस्ती आहे. या डोंगराच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. काल पासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ५ घरांवर ही भिंत कोसळून त्यात ११ जणांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आतापर्यंत ढिगार्‍याखालून १६ जणांना बाहेर काढले आहे.

 


 त्यात या घरांमधील २० जण ढिगार्‍याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल, एनडीआरएफचे (NDRF) पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी बचाव कार्य सुरु केले आहे. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा