Breaking
सुरगाणा : वांगण सुळे येथे एकाच दिवसात केले २६० ग्रामस्थांचे लसीकरण


माजी सभापती मंदाकिनी भोये याचे  मार्गदर्शनाखाली संपन्न


माजी आमदार जे. पी. गावित यांनी व्हिडीओ कॉल करून केले ग्रामस्थांचे अभिनंदन

सुरगाणा / दौलत चौधरी : ज्या गावात एक ही वेक्ती लसीकरण करायला तयार नव्हता तेथे पहिला लसीकरण कॅम्प माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी घेतला. तेंव्हा फक्त ११ ग्रामस्थांनी लसीकरण केले होते ते सुद्धा सायंकाळी ४ वाजता लसीकरणाला तयार झाले होते.


मात्र काल या गावात रेकॉर्ड लसीकरण करायचे या हेतूने मंदाकिनी भोये हे सकाळी १० वाजताच गेले होते. मात्र दिवसभर गावात घरोघरी फिरून ग्रामस्थांना लसीकरणासाठी तयार केले. तेंव्हा दिवसअखेर २६० ग्रामस्थांनी लसीकरण केले. आज या गावामध्ये लसीकरण कॅम्प नसतांना डॉ. कमलाकर जाधव यांनी बेंडवळ बरोबरच येथेही लसीकरण कॅम्प लावला व तेथेही ४० ग्रामस्थांनी लसीकरण केले. 

अश्या प्रकारे प्रथमच ह्या टीमने ३०० ग्रामस्थांचे लसीकरण केले. त्याबद्दल त्यांच्या टीमचेही माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी अभिनंदन केले तसेच लसीकरण कॅम्प यशस्वी ठरवण्या कामी मदत करणारे बळवंत जाधव, पोलीस पाटील परशराम चौधरी, कांतीलाल भुसारे, ढवळू पेटार, गुलाब म्हसे व रामदास भुसारे या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले
 
तसेच माजी आमदार जे. पी. गावित जेंव्हा ही बातमी समजताच त्यांनीही व्हिडीओ कॉल करून वांगण सुळे येथील लसीकरण केलेल्या सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच गावातील लसीकरण न केलेल्या इतर ग्रामस्थांनाही त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा