Breaking


ब्रेकिंग : गणेशखिंड येथे एका माल वाहतूक गाडीचा अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील गणेशखिंड येथे एका माल वाहतूक गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


MH 2 FG 5004 असा या गाडीचा नंबर असून ही गाडी नारायणगाव येथून भाजीपाला घेऊन वाशीला जात होती, त्यावेळी गणेशखिंड मार्गे मढ कडे जाताना वळणावर ही माल वाहतून गाडी पलटी झाली आहे. या गाडीत चार व्यक्ती होत्या, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.


दरम्यान, गेल्या आठवड्यातही एका प्रविण मसाल्याच्या पिकअप गाडीचा अपघात झाला आहे. या अगोदरही या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा