Breaking


अभिनेत्री दीपाली सय्यद यांची पूरग्रस्तांना 10 कोटीची मदत


कोल्हापूर : अर्ध्या महाराष्ट्राला तुफान पाऊस, महापूर आणि दरड दुर्घटनांनी उद्ध्वस्त केलं. जसजसा महापूर ओसरत आहे, तसतशी त्याची दाहकत समोर येत आहे. अनेक भागात नेते, अभिनेते दौरे करत आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली.


दीपाली सय्यद यांनी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. दीपाली सय्यद म्हणाल्या, “भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षापूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. मी हे चित्र डोळ्याने बघितलं आहे. काहीच उरलं नाहीय. दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय”

कोण आहे दीपाली सय्यद?

दिपाली सय्यद या अभिनेत्री म्हणून परिचित आहेत. दीपाली सय्यद यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आपकडून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत दीपाली सय्यद यांचा पराभव झाला होता.

दीपाली सय्यद यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मुंब्रा-कळवा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. दीपाली सय्यद यांनी साकळाई उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी उपोषण केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा