Breaking
अहमदनगर : आदिवासी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थाच्या वधु-वर सुचक मंडळाच्या वेब साईटचे उदघाटन


वधुवर सुचक मंडळाच्या माध्यमातुन आधुनेकतेबरोबरच परंपराही जपल्या जाव्यात-प्रा.नितिन तळपाडे


अहमदनगर : आज आदिवासी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, अहमदनगर च्या वधु-वर सुचक मंडळाच्या https://www.abssa.in/ याावेब साईटचे कोविड चे नियम पाळून आॅन लाईन उदघाटन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे व सचिव सुरेश शेंगाळ यांचे हस्ते क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रत्यक्ष मोजक्या मान्यवर सभासदांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डाॅ.सोमनाथ नंदकर म्हणाले की, " समाजातील युवकांनी शिक्षणावरभर देऊन कोणत्याही शाखेत प्राविण्य मिळविण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रंसगी अधिक मेहनत घेऊन नविन क्षेत्रान प्रयत्न करायला हवेत." व करमाळ्याहुन प्रा.नितीन तळपाडे यांनी समाज बांधवानां आॅनलाईन मार्गदर्शन केले. 

ते म्हणाले की, "सस्थेच्या माध्यमातुन राज्यभर पसरलेल्या समाजाला एक व्यासपीठ मिळतय. विवाह बंधन सारख्या कार्यातुन समाज चांगल्या प्रकारे बांधला जाईल. आधुनेकतेची कास धरुन परंपराही जपल्या जातील ही अपेक्षा." कल्याण वरुन शोभाताई घाणे, ईगतपुरी वरुन नाथु पिचड, नांदेडहून परशु देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे यांनी समाज बांधवानां संस्थेद्वारे करत असलेल्या विविध कार्याची माहिती दिली. अडचणीच्या कोणत्याही प्रंसगी संस्था नेहमी पुढे राहिल अशी ग्वाही दिली. संस्थेचे सचिव सुरेश शेंगाळ यांनी वधुवर सुचक मंडळाच्या बेव साईटची सविस्तर माहिती देऊन विविध शंकाचे निरसन केले व सुरक्षतेची माहिती दिली. सुधा धिंदळे यांनी विवाह ईच्छुकांनी बेवसाईटवर प्रोफाईल अपडेट कण्याचे अहवान केले, सोबतच आरोग्यपुर्ण शरीराची काळजी घेण्यासाठी योगाभ्यासाची माहिती दिली.

संपुर्ण उदघाटन कार्यक्रमाचे प्रांजल शेंगाळ हिने गुगल मिटवर आॅनलाईन आयोजन करुन संपुर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवानां कार्यमात सहभागी करुन घेतले. प्रसंगी रामनाथ कचरे, उपाध्यक्ष निवृत्ती भांगरे, खजिनदार गंगाधर धोंगडे, सहसचिव रावजी भोजणे, श्रीमती हेमलता सुकटे, भरत साबळे, हनुमंता सोनवणे, एकनाथ घोडे, सुनिता शेळके, दिनकर भांगरे, विलास भारमल, संतोष नवले, भाऊराव डोळस, संतोष भांगरे, संतोष कचरे, नवले संतोष, सोनवणे हनुमंता, निवृत्ती भांगरे, निवृत्ती लांघी, हिरामण पोपेरे, गंगाधर धोंगडे, एकनाथ घोडे, महेश शेळके, साबळे भरत, दामू शेळके, शंकर लांघी, आदिनाथ भांगरे, नवनाथ भांगरे, बाळकृष्ण धिंदळे, पडवळे साहेब, सोमनाथ लेंडे, कोकतरे सर, कवी तानाजी सावळे आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संस्थेचे कार्याध्यक्ष शिवानंद भांगरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा