Breaking
अकोले : केळी - कोतूळच्या तरुणांनी तहसिलदारांना ऐकवला समस्यांचा पाढा !कोतुळ / यशराज कचरे : सातेवाडी गटातील केळी-कोतुळ येेथील तरुणांनी तहसिलदार मुकेश कांबळे यांना समस्यांचा पाढा ऐकवला. 


स्वतंत्रत्तोर काळापासून आदिवासी दुर्गम भाग हा मूलभूत सुविधांपासून वंचीत आहे, आत्ताशी कुठं हळूहळू आदिवासी दुर्गम भागात सोयीसुविधा येत आहेत. त्यात हि काही भाग वाड्या वस्त्या ह्या विकासापासून वंचीत आहेत, अजून हि मूलभूत सोई सुविधा पोहचल्या नाहीत हीच शोकांतिका आहे.


रस्ते, आरोग्य, नेटवर्क, शाळा दुरुस्ती असेल, पाण्याची समस्या या समस्या अजून हि वाड्या वस्त्यांवरील जनतेला भेडसावत आहेत. केळी कोतुळ गावात जिओ चा टॉवर असताना गावातील काही भागात नेटवर्क चा प्रश्न भेडसावत आहे. गोडेवाडी गावची लोकसंख्या हि 2021 च्या जणगनेनुसार 1600 च्या आसपास आहे. त्यात गावात एक केंद्रीय प्राथमिक शाळा, एक महाविद्यालय असून शासनाने मागील दोन वर्षा पासून कोरोना मूळ शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण चालू केलं आहे. पण ग्रामीण भागात अशी अवस्था आहे कि मोबाईल असेल तर नेटवर्क नसते या समस्येमुळे विद्यार्थी तसेच इतर जनता त्रस्त आहे.


वारंवार जिओ कंपनी ला निवेदन देऊन हि दुरुस्ती केली जात नाही, याला कंटाळून गावातील तरुणांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना भेटून समस्यांचा पाढाच ऐकवला. तहसीलदार मुकेश कांबळे साहेब यांनी हि तरुणांना शब्द दिला कि यावर नक्कीच उपाय काढला जाईल.


निवेदन देतेवेळी लेंभे, ग्रामविकास अधिकारी दुशिंग, बिरसा बिग्रेड अकोले चे उपाध्यक्ष गणेश गोडे, महेश शेळके, अमोल गोडे, सोमनाथ गोडे, मधुकर गोडे, प्रवीण गोडे, मोहित गोडे, अमोल गोडे, वासुदेव गोडे, मोहन गोडे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा