Breaking
अकोले : टिटवी येथे बस सुरू होणार, सरपंचांच्या मागणीला यश


अकोले (अहमदनगर) : ठिय्या आंदोलनानंतर टिटवी गावी राजूरच्या आठवडे बाजाराच्या दिवशी बस सोडणार असल्याने ग्रामपंचायतीच्या मागणीला यश आले असल्याचे म्हटले आहे. 


टिटवी गावाच्या सरपंच यांच्या 5 वर्षाच्या पाठपुराव्यास यश आले आहे. पाच वर्ष वारंवार निवेदन, ग्राम पंचायत ठराव देऊन टिट्वी गावात बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पाठपुरावा करुनही प्रशासन निर्णय घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी आज (दि.१९) तहसीलदार व पोलीस स्टूशनला देऊन अकोले बस आगार व्यवस्थापक यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले.

आगार व्यवस्थापकांनी १५ मिनिटात टिटवी गावाला आठवडी बाजार सोमवारी राजुर ते टिटवी गाडी सुरु करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा