Breaking
अकोले : राजूर येथील बीएसएनएल टॉवरला बँटरी बसवा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा


राजूरच्या बीएसएनएल कंपनीला मनसे चा शेवटाचा इशारा


राजूर / डॉली डगळे : अकोले तालुक्यातील अति दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क सेवा असलेल्या बीएसएनएल कंपनीचे मोबाईल टॉवर असून ऐन पावसाळ्यात लाईट बारा बारा तास गेल्यास या टॉवर ला बँटरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोबाईल नेटवर्क ही बंद होते, पर्यायाने जनसंपर्क बंद होते व मुलांचेऑनलाईन शिक्षणावर देखील परिणाम होत आहे.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोले तालुका संघटक योगेश कोंडार यांनी राजूर येथे असलेल्या बीएसएनएल कार्यालयात वांरवार लेखी तक्रार करून देखील नविन बँटरी बसविण्यात आले नाही, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेवटचा इशारा दिला आहे. आठ दिवसात बँटरी संच न बसविल्यास राजूर येथील बीएसएनएल कार्यालयावर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा