Breaking
मोठी बातमी : MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, विधानसभा अधिवेशनात सरकारची घोषणा


मुंबई, दि. ५ : राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे . अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "राज्यात सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. आजच विधेयक मांडू आणि ते आजच पास करू असा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अधिवेशनात देखील विरोधकांनी एमपीएससीवरुन प्रश्न उपस्थित करत सरकारला कोडीत पकडण्याचा प्रयत्न केल.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय ? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला. 

देवेंद्र फडणवीसांच्या सवालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा