BreakingVideo : आंबेगावात अतिवृष्टीमुळे भात खाचरे वाहून गेली, रस्ते खचले; दरडी कोसळल्या


फुलवडे (दि.२२) : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात पाच दिवसांपासून अतिवृष्टीमुळे उपजीविकेचे मुख्य साधन असलेले भात पीक खाचरांच्या बांधांसह वाहून गेले. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून काही ठिकाणी दरडी देखील कोसळल्या आहेत.


शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आदिवासी बांधवांना मदत करावी, अशी मागणी कोंढवळ येथील किरण केदारी, सुभाष तिटकारे, संतोष दांगट, संतोष वायळ या शेतकऱ्यांनी केली आहे. 

मुसळधार पावसामुळे विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सततच्या पावसामुळे बोरघर - आहुपे हा नुकताच तयार केलेला रस्ता खचला आहे. यामुळे असाणे, आमडे, माळीण, कुशिरे, भोईरवाडी, तिरपाड, नानवडे, न्हावेड पिंपरगणे, डोण, आघाणे, आहुपे या गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेताचे, पिकांचे, घरांचे व घरातील वस्तुंच्या झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.

अधिक वाचा :

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदीराच्या गाभाऱ्यात शिरले पाणी


माळीण फाट्यावरील रस्ता सततच्या पावसाने खचला 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा