Breaking
पुणे विद्यापीठात ‘पीएच.डी’ प्रवेशाच्या ‘पेट परीक्षे’साठी अर्ज करता येणार


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठातर्फे ‘पेट परीक्षा’ (Pet Exam) २२ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून (ता.१२) ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली. 

विद्यापीठात पीएच.डी करण्याची संधी मिळावी, म्हणून विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे पीएच.डी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असते. विद्यापीठात पीएच.डी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन टप्पे पार करावे लागतात. पहिला टप्पा म्हणजे पीएच.डी प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा. ही परीक्षा १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची असणार आहे. यात ‘रिसर्च मेथडॉलॉजी’वर ५० गुणांचे, तर संबंधित विषयावर ५० गुणांचे असे एकूण १०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात येतील. या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दुसरा टप्प्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, त्यात प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल.


पीएच.डी’साठीच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक : 

पीएच.डी. प्रवेश परीक्षा : २२ ऑगस्ट, २०२१ 


प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १२ जुलै २०२१ 


प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ३१ जुलै २०२१ 


प्रवेश परीक्षेच्या निकालाची तारीख : २४ ऑगस्ट २०२१ 


प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :

http://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा