Breakingप्रकाश आंबेडकर रजेवर ; वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी केली "यांची" नियुक्तीमुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अध्यक्षपदी रेखाताई ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

 


 प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे की, मी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरहीत राहणार नाही, माझ्या व्यक्तिगत कारणासाठी, पक्ष हा चालला पाहिजे, संघटन हे चालले पाहिजे, आंदोलनाला आपण सुरुवात केली आहे, पाच जिल्ह्यामध्ये निवडणूका आहेत म्हणून पक्षाला अध्यक्ष असणं महत्त्वाचे आहे, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा