Breakingशिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी राज्य संपर्क प्रमुखपदी जयश्री चव्हाण यांची नियुक्ती


पुणे / पौर्णिमा बुचके : शिवशाही व्यापारी संघ रायगड जिल्हा संघटक दत्तात्रेय गिलबिले यांच्या सुचनेने व रायगड जिल्हाध्यक्ष इरफान खान यांच्या अनुमोदनाने जयश्री चव्हाण यांची शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी राज्य संपर्क प्रमुखपदी निवड केल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अल्ताफ मंसुरी यांनी केली.


जयश्री चव्हाण या मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा असून चित्रपट क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवशाही व्यापारी संघाच्या माध्यमातून ‘त्या’ प्रयत्न करतील. नवनियुक्त महिला आघाडी राज्य संपर्क प्रमुख जयश्री चव्हाण यांनी सर्वसामान्य जनतेसाठी, व्यापारी वर्गांसोबत राहून दिव्यांग तसेच तृतीयपंथीची सेवा करण्यासाठी सदैव कटीबद्द राहण्याच्या सुचना अल्ताफ मंसुरी यांनी देऊन पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश उपाध्यक्ष अल्ताफ मंसुरी, शिवशाही व्यापारी संघ मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष शेट्टी, महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष तनुजा ताई गुळवी, रायगड जिल्हाध्यक्ष इरफान खान, रायगड जिल्हा संघटक दत्तात्रेय गिलबिले, रायगड जिल्हा प्रवक्ता भाऊ सणस, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आतिश धामणकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ देवघरे, कर्जत-खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख शाहिद शेख आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा