Breaking
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना त्वरित अटक करा - अतिशभाई खराटेमलकापूर : बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा या गावांमध्ये येऊन शिवसेना आमदार संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी असताना दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणून बुजून चिथावणीखोर वक्तव्य केलं व अनुसूचित जातीच्या लोकांवर दबाव आणण्यासाठी व भविष्यामध्ये त्यांना धाक दडपणाखाली राहण्यासाठी गैरकायदेशीर वक्तव्य केलं त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तसेच विविध कलमान्वये गुन्हे दाखल करा असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी केले आहे.


आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात खामगांव पो. स्टे.मध्ये फिर्याद दाखल आहे, सदरची फिर्यादीनुसार अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्वरित कारवाई करून अटक करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष सुशील मोरे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मलकापूर पोलीस स्टेशन ठाणेदार मार्फत निवेदन देण्यात आले.निवेदन देते वेळी भा.बौ.महासभा जिल्हाध्यक्ष एस.एस.वले, वंचित जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, ता. उपाध्यक्ष दिलीप वाघ, गजानन झनके, विनोद निकम, विलास तायडे, गणेश सावळे, शेख यासीन कुरेशी, संघटक अजाबराव वानखेडे, भा.बौ.म. तालुकाध्यक्ष राजू शेगोकार, उपाध्यक्ष महादेव तायडे, कडू धुरंधर, वंचित आघाडीचे सर्कल प्रमुख विनोद मोरे, धम्मपाल उमाळे, सचिन तायडे, जनार्दन इंगळे, दगडु राणे, अशोक भालशंकर, सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा