Breaking
एम.टी.एस.एस.डी.वर्कर्स (डिफेन्स) रणगाडा डेपो युनियनच्या अध्यक्षपदी कॉ. सलीम सय्यद यांची निवडपुणे : खडकीतील सेंटर आरमार्ड डेपो ५१२ युनिट मधील एम.टी.एस.एस.डी.वर्कर्स युनियनच्या अध्यक्षपदी कॉम्रेड सलीम सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.


ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज युनियनला ही संघटना संलग्न आहे. देशातील ४११ युनियनचे मुख्य कार्यालय खडकी येथे आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून संरक्षण दलाच्या गरजा पुरवणारे देशभरात अनेक कारखाने आहेत. सेंटर आरमार्ड डेपो येथे युद्धभूमीवरील रणगाड्याचे मेंटेनन्स या ठिकाणी केले जाते.


भारतीय सैन्यदलाच्या मानकाप्रमाणे सलग १० हजार किमी नंतर प्रत्येक रणगाडा इथे देखभालीसाठी येतो. सरकारने खरेदी केलेल्या रणगाड्याची संपूर्ण क्वालिटी, डिलिव्हरी खडकी येथून होते. खडकी येथील हजारो इंजिनिअर, कर्मचारी, तंत्रज्ञ सात दशकाहून जास्त वर्षे सेना दलाच्या गरजा पूर्ण करत आहेत.


सन २०२१-२२ साठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये अध्यक्षपदी सलिम सैय्यद तर उपाध्यक्ष फिरोज सैय्यद, राजेंद्र घुले, दुर्गाजी लोखंडे, सचिव सचिन कांबळे, सल्लागार मोहन होळ, सहसचिव हनुमंत जांभूळकर, सतिश सात्रस, सचिन बुगडे, जोसेफ के.थाॅमस, खजिनदार किरण ननावरे, कार्यालयीन सचिव एस.बी.घोगरे, सुनील विश्वकर्मा, दिनेश भिंताडे, सचिन चवरे, संघटक सचिव अभिनंदन गायकवाड, लक्ष्मण भोईर, सत्यवान शेडगे यांची निवड करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा