Breaking
डॉ. कुंडलिक केदारी यांना 'निळू फुले स्मृती कलागौरव पुरस्कार' प्रदान


पुणे : विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कला क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येणारा 'निळू फुले स्मृती कलागौरव पुरस्कार' यंदा दिग्दर्शक निर्माता डॉ. कुंडलिक केदारी, साहित्य क्षेत्रातील डॉ. राजेंद्र कुंभार, पत्रकार सुनील माने आणि सामाजिक क्षेत्रातील रुक्मिणी नागापुरे यांना आज प्रदान करण्यात आला.


माजी रणजी क्रिकेटपटू श्याम ओक, ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या शुभहस्ते व विश्वकर्मा विराट संघाचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी च्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी ( ता .१६ ) दुपारी बारा वाजता दांडेकर पूल येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात प्रदान करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा