Breaking
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेकसोलापूर : भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सायंकाळी ८ वाजता समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर घोंगडी बैठकीसासाठी आले असताना ही घटना घडली.


पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यात गाडीची पुढची काच फुटली आहे.


दरम्यान, या घटनेनंतर आमदार पडळकर यांनी म्हटले आहे की, "प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल. तसेच घोंगडी बैठका सुरूच राहतील", असे पडळकरांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा